
मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सइद अटकेत
लाहोर: मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला आज पाकिस्तानातील लाहोरमध्ये अटक करण्यात आली. पाकच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दहशतवादाविरोधात भारतानं जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानलं जात आहे.
www.konkantoday.com