
चिपळूण कालुस्ते येथे दरड कोसळून दहा घरांचे नुकसान
चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते खुर्द करंजीकर मोहल्ला येथील 6.30 वाजता दरड कोसळून मंजूर परकार, अली परकार ,सुलतान परकार ,हलीमा अब्दुल कादिर परकार, सल्लादिन परकार ,नजीर परकार,फईन परकार,यांच्या घरावर दरड कोसळली.
यात हलीमा अब्दुल कादिर परकार या जखमी झालेल्या असून त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यासाठी अमिन अब्दुल कादिर बिजले व नंदकिशोर गुढेकर यांनी प्रयत्न केले,सदर ठिकाणी उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप व त्यांचे सहकारी हजर होते तसेच चिपळूण तालुक्यातील आमदार चव्हाण साहेब,माजी सभापती शौकतभाई मुकादम, शहराध्यक्ष श्री.रतन पवार, शहराध्यक्ष श्री. फैसल पिलपिले, समीर काझी, मुबारक सकवारे, दानिश काद्री, नूरभाई बिजले, यांनी भेट दिली असता माजी जिल्हापरिषद सदस्य शौकतभाई परकार व कालुस्ते येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन दरड उपसण्याचे काम केले.
www.konkantoday.com