पनवेल-कर्जत, कर्जत-खोपोली, कल्याण-कर्जत मार्गासाठी खा. सुनिल तटकरे यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली – कोकण रेल्वेसंदर्भात आज संसदेत बोलताना रायगड लोकसभा मतदारसंघाचे खा. सुनिल तटकरे यांनी कर्जतपर्यंतच्या गाड्या व रेल्वे मार्गांचे प्रश्नही प्रामुख्याने मांडले. पनवेल ते कर्जत लोकल गाड्या जात नाहीत, त्यासाठी मंत्र्यांनी लक्ष घालून नवे रेल्वे स्टेशन तेथे आणावे. कर्जत ते खोपोली एकट ट्रॅक आहे, त्याठिकाणी डबल ट्रॅक करावा. कल्याण ते कर्जत दोनच ट्रॅक्स असल्याने मोठी कोंडी होत आहे, याठिकाणी तीन ट्रॅक करावेत, अशी मागणी त्यांनी सभागृहात मंत्र्यांकडे केली. तसेच कर्जत रेल्वेस्थानकात फूट ओव्हर ब्रीजची कामे प्रलंबित असून ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button