रत्नागिरी ः नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रायगड येथे स्थलांतरित होण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले असले तरी हा प्रकल्प नाणार येेथेच व्हावा याच्या समर्थनार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कोकणप्रेमी एकत्र आले असून त्यांनी कोकण विकास समिती स्थापन केली आहे. या समर्थनार्थ उभ्या केलेल्या चळवळीला जनतेकडून प्रतिसाद मिळत असतानाच नाणार येथील रिफायनरी प्रकल्प हटविण्यासाठी स्थापन झालेल्या कोकण महाशक्ती संघाने याला विरोध करण्याचे ठरविले आहे. त्याबाबत कोकण महाशक्ती संघाचे नेते अशोक वालम यांनी मुंबईत एक बैठक घेवून या नाणार प्रकल्पासाठी समर्थन करणार्‍यांना व ते पाठिंब्यासाठी काढत असलेल्या मोर्चाला समोरासमोर जावून भिडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणूका असल्यामुळे या संदर्भात राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here