रत्नागिरी ः शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार असून या पदावर भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी हे पद भाजपला मिळावे अशी मागणी केली होती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती असल्याने शिवसेनेने अडीच वर्ष हे पद उपभोगले असल्याने पूर्ण उर्वरीत काळा करीता पद भाजपला मिळावे अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र वरिष्ठच त्याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज रत्नागिरी दौर्‍यावर आलेले म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी हे नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच राहिल असे सुतोवाच केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते ना. रविंद्र चव्हाण यांचेबरोबर बोलणे झाले असून भाजपचे वरिष्ठच जिल्हाध्यक्षांना याबाबत योग्य त्या सूचना देतील असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here