चौपदरीकरणात डोंगराचे कटींग केल्याने कामथे, हरेकरवाडीतील घरांना धोका

0
153

रत्नागिरी ः सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या अनेक भागात जोरात सुरू आहे. या चौपदरीकरणासाठी काही भागात डोंगराचे मोठ्या प्रमाणाचे कटींग करण्यात आले आहे. चिपळूणजवळील कामथे, हरेकरवाडी येथील डोंगराचे चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या जागेपर्यंत कटींग करण्यात आले होते. मात्र हे केल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आली नाही.
सध्या पडणार्‍या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर माती खाली येत आहे. यामुळे हरेकरवाडीतील १० घरांना धोका निर्माण झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here