लांजा ः मुंबई-गोवा चौपदरीकरणामुळे लांजा येथे महामार्गावर मोठे खड्डे पडले असून सध्या पडणार्‍या पावसामुळे त्यात पाणी भरत असल्यामुळे या मार्गावरून वाहने चालविणे धोकादायक आहे. याबाबत लांजा ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली नव्हती. लांजा, राजापूर, साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी आज या ठिकाणी भेट देवून चौपदरी कामाचा आढावा घेतला. रस्त्याच्या असलेल्या वाईट अवस्थेबाबत व खड्ड्यांबाबत अधिकार्‍यांना फैलावर घेत जाब विचारला. व यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले.
पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. त्याबाबत तक्रारी आल्यानंतर कोकणातील आमदारांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात सुधारणा न झाल्याने कणकवलीपासून खेडपर्यंत या विषयासाठी आंदोलने करावी लागली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here