साखरपा येथे तिहेरी अपघातात तीन जण जखमी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर साखरपा स्कूलनजीक एसटी, पिकअप व टँकर या तीन वाहनांच्या अपघातात तीन जण जखमी झाले असूनत्यांची नावे संतोष कांबळे श्रीपत रामाणे अशी आहेत त्यांना रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे मार्लेश्वर येथून सांगलीकडे जाणाऱया एसटीच्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप व टँकरना तिची धडक बसली त्यामुळे पिकअपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्यातील प्रवासी जखमी झाले.