
वेळणेश्वर दोडवली कोंडवी येथे महिलेवर बलात्कार
शेतात काम करणाऱ्या महिलेला बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाचा प्रकार वेळणेश्वर दोडवली कोंडवे येथे घडला आहे .आरोपी टूनटून कुमार राहणार बिहार याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदरची महिला शेतात काम करीत असताना आरोपी तेथे आला व त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.यावेळी सदर महिला पळू लागली आरोपीने तिचा पाठलाग करून तिला बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.फिर्यादी महिलेला साडी आवळून मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला सदर महिलेने सुटका करून घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.




