कोकणच्या पर्यटनाबाबत आज मंत्रालयात बैठक

रत्नागिरी ः कोकणातील पर्यटन विकासाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. कोकणातील पर्यटन उद्योगास दर्जा मिळावा, प्रकल्प प्रत्यक्ष राबविताना येणार्‍या अडचणी, तसेच न्याहारी निवास योजनेतील प्रकल्पांच्या अडचणी, कृषी, साहसी, पर्यटन, सागरी पर्यटन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन याबाबत या बैठकीत विचार होणार असून या बैठकीला माजी आ. प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, पुनर्वसन महामंडळाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, कोकण प्रतिष्ठानचे संजय यादव आदीजण उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button