नवी दिल्ली : सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित एलपीजी सिलेंडरचे भाव १००.५० रुपयांनी कमी झाले आहेत. एक जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठीचा सिलेंडर ६३७ रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलेंडर घेताना ग्राहकांना एक जुलैपासून ७३७.५० रुपयांऐवजी ६३७ रुपये द्यावे लागतील.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने रविवारी याबद्दल प्रसिद्धी पत्रक काढून याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here