
नावातील घोळामुळे गुणपत्रिका भलत्याच शाळेत कोकण बोर्डाचा कारभार
दहावीच्या वीस मुलांच्या गुणपत्रिका भलत्याच शाळेत पाठवण्याचा प्रकार कोकण बोर्डाने केला आहे खेड येथील न्यू इंग्लिश स्कूल आंबवली या शाळेतून दहावीसाठी ५८ विद्यार्थी पास झाले होते शाळेत गुणपत्रिका आल्यावर शाळेत गुणपत्रिका आणण्यासाठी विद्यार्थी गेले असता वीस विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका नसल्याचे आढळून आले याबाबत मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे तक्रार केली अखेर याबाबत शोधाशोध करण्यात आली हा दिवसांनी व्या गुणपत्रिका आंबवली शाळेऐवजी आंबडस शाळेत मिळाल्या मात्र या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांना तणावाखाली आठ दिवस ताटकळत रहावे लागले.
www.konkantoday.com