पोलीस अधिक्षकांची चर्चा झाल्याशिवाय खेडमधील पत्रकारांचे बेमुदत उपोषण मागे घेण्यास नकार
खेड ः मटका जुगार यासारखे अवैध धंदे चालविणार्यांकडून खेड येथील पत्रकारांना धमकी व मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील पत्रकारांन गुरूवारपासून खेड शहरातील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडलं आहे. दरम्यान प्रांताधिकारी अविशकुमार सोनोवे तसेच पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांनी तीन वेळा उपोषणकर्त्या पत्रकारांची भेट घेत उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत पोलीस अधिक्षक स्वतः उपोषणस्थळी येवून चर्चा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं पत्रकारांनी स्पष्ट केलं आहे.