मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्‌ये:
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची व्याप्ती वाढविली; सदर योजनेसाठी रु. ३४ कोटी ७५ लक्ष इतकी तरतूद
नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेस चे कार्यारंभ आदेश
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित; काम प्रगतिपथावर
सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल ३ च्या बांधकामासाठी रु. ७७५ कोटी ५८ लक्ष इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातर्ंगत आतापर्यत रु. २ हजार २०० कोटी किमतीचे ४० प्रकल्प
चालू आर्थिक वर्षात नगरविकास विभागाकरीता एकत्रित ३५ हजार ७९१ कोटी ८३ लक्ष ६८ हजार रु. तरतूद
गेल्या ४ वर्षात ५ लाख २६ हजार ८८४ कृषी पंपाना वीज जोडणी; ५ हजार ११० कोटी ५० लक्ष खर्च
कृषी पंपाना वीज जोडण्या देण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय; रु. ५ हजार ४८ कोटी १३ लक्ष खर्च अपेक्षित
वीजवितरण प्रणालीचे वृध्दीकरण व आधुनिकीकरण करण्याकरीता नविन वीज उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय; राज्यात ४९३ उपकेंद्र उभारण्यात आली असून व २१२ उपकेंद्राची क्षमता वृद्धी
नागपूर जिल्हयातील कोराडी येथे १३२० मेगावॅट क्षमतेच्या नव्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला मान्यता; ८ हजार ४०७ कोटी रु. खर्च अपेक्षित.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलियन डॉलर म्हणजे रु. ७० लक्ष कोटी करण्याच्या लक्ष्य पुर्तीसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे पुनरुज्जीवन करणार; चालू आर्थिक वर्षात रु. २० कोटी एवढा नियतव्यय राखीव.
११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्ंगत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पूर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर.
पत्रकार सन्मान योजनेत वाढ. आता ही रक्कम २५ कोटींवर
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्ंगत ५०.२७ लाख खातेदारांसाठी २४ हजार १०२ कोटी मंजूर
ओबीसी समाजासाठी राज्यात ३६ वसतीगृह सुरू करणार
राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतर्ंगत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार
कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यासाठी १०० कोटी उपलब्ध करणार
अर्थसंकल्प सुरू असताना विरोधकांचा सभात्याग
अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात ओबीसी मुद्द्यावरून खडाजंगी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद
८० टक्के दिव्यांग असणार्‍यांना सरकार घर बांधून देणार
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतर्ंगत ४६ प्रकल्पांना मान्यता
अर्थसंकल्पः २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर
मृद व जलसंधारण विभागाकरीता ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजारांची तरतूद
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागासाठी १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजारांची तरतूद
सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद
साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
बळीराजा जलसंजीवनी योजनेकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन
राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ
काजू उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
चार कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद
कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद
जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद
जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा
शेतकर्‍यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न
गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी खर्च
शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावण्याची निर्मिती केली
पिण्याच्या पाण्यासाठी राज्यात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला
दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५६३ कोटी रुपये मिळाल्याची अर्थमंत्र्यांची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here