अर्जुना नदीतील भराव बाहेर काढण्यास सुरूवात
राजापूर ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात राजापुरातील अर्जुना नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाकरिता नदीपात्रात टाकण्यात आलेला मातीचा भराव हटविण्यास सुरूवात झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या मार्गावरील सर्वात मोठा पुल शहरातील अर्जुना नदीवर उभारण्यात येत आहे. या पुलाच्या कामाला सुरूवात झाली असून नदीपात्रातील तीन खांब सध्या अर्धवट स्थितीत उभे राहिले आहेत. या पुलाचे खांब उभारण्यासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला होता.