विकल्पा मिरगल खेर्डीच्या प्रभारी सरपंच
चिपळूण ः खेर्डी ग्रामपंचायतीचा यापुढचा सरपंच कोण अशी चर्चा सुरू असानाच सदस्या सौ. विकल्पा मिरगल यांना प्रभारी सरपंच म्हणून मान मिळविला आहे. शुक्रवारपासून त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे. दरम्यान सरपंच सौ. जयश्री खताते यांना अविश्वास ठरावावर अपील करण्यासाठी सात दिवसांच्या कालावधीची संधी असून याविषयी जिल्हाधिकारी व कोकण आयुक्तांकडे दाद मागता येते. तसे झाल्यास या सरपंच पदाची निवडणूक किमान दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू मानल्या जाणार्या खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. खताते यांच्याविरोधात १२ जून रोजी अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर खेर्डीचा सरपंच कोण? असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जात होता. पुढील वर्षभराचा कालावधी शिल्लक असल्याने यासाठी सहा सहा महिन्यांचा फॉर्म्युला तयार केला जात असतानाच सदस्या सौ. मिरगल यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.