मुंबई ः राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार बारगळ्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे कोककोणत्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली होती. दोन्ही बाजूनी एकमेकांविरूद्ध गर्जना केल्या जात होत्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे नेते पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत होती.
आज १४ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचीही चर्चा जोरात होती. मात्र प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here