माजी सभापती तबस्सुम हवांना धमकी
दापोली ः पडक्या गोठ्याचा फोटो काढण्यासाठी गेलेल्या दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. तबस्सुम हवा यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तालुक्यातील जामगे येेथे तबस्सुम बानुमुराद हवा यांच्या नावे गोठा आहे. सदर गोठा हा दिलावर दाऊद हवा, अमिना दाऊद हवा, यास्मिन दाऊद हवा यांनी पाडला होता. सदर गोठ्याचे फोटो काढण्यासाठी तबस्सुम हवा व त्यांचे नातेवाईक गेले असता त्यांचा रस्ता अडवत दिलावर, अमिना व यास्मिन हवा यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तबस्सुम हवा यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे.