कात्रोळी येथे ग्रा. पं. सदस्याला मारहाण
चिपळूण ः तालुक्यातील कात्रोळी ग्रा. पंच्या सदस्या अर्चना अनंत निवळकर यांना जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर रामपूर प्रा. आ. केंद्रात उपचार करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कात्रोळी कुंभारवाडी येथे सदस्या अर्चना निवळकर या आपल्या कुटुंबासह राहतात. सामायिक जमिनीवरून त्यांच्या कुटुंबात वाद आहेत.