एस.टी. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढील दोन एस.टी.ना धडक देवून अपघात
रत्नागिरी ः तीन एसटी गाड्यांच्या अपघातात आठ प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले असून तिन्ही बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरचा अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली बाजारपेठ नजिकच्या देवतळे फाटा येथे घडला.
रत्नागिरी लांजा एस.टी. बस प्रवाशांना उतरविण्यासाठी देवतळे फाटा येथे थांबली होती. पाठिमागून येणार्या रत्नागिरी लांजा गाडीच्या चालकाने आपल्या बसमधील प्रवाशांना उतरविण्यासाठी ती पाठिमागे थांबविली. रत्नागिरी-राजापूर या एस.टी. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे उभ्या असलेल्या दोन्ही गाड्यांवर ती जोराने आपटली.