पक्षविरोधी काम करणार्‍यांविरूद्ध कारवाई न केल्यास विधानसभेतही लोकसभेची पुनरावृत्ती

लांजा ः जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्ष अधिक मजबूत व्हावा यासाठी नेत्यांनी स्थानिकांना राज्यसभा सदस्य, विधानसभेचे सदस्यत्व सहा वर्षासाठी दिले आहे. याच नेत्यांनी कॉंग्रेस पक्ष संपविल्याची टीका माजी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सदानंद गांगण यांनी केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. सदर मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद लक्षात घेता बांदिवडेकर हे किमान दुसर्‍या क्रमांकावर राहणे अपेक्षित होते. त्यांची अनामत रक्कम जप्त झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महाआघाडीतर्फे निवडणूक लढविण्यात आली होती. पराभवाच्या कारणांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला आहे. पक्षविरोधी काम करणार्‍या पदाधिकार्‍यांवर नेत्यांनी वेळीच कारवाई न केल्यास विधानसभा निवडणुकीत पराभवाची पुनरावृत्ती होईल असे भाकित ऍड. गांगण यांनी वर्तविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button