
राज्यात सवार्र्त जास्त पाऊस पडूनही रत्नागिरी शहर तहानलेलेच उद्यापासून एकदिवस आड शहराला पाणी, नागरिक हैराण
रत्नागिरी ः शीळ धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे. केवळ १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय रत्नागिरी पालिकेने घेतला आहे. शहरातील वरच्या भागाला एक दिवस तर खालच्या भागाला एक दिवस असा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारपासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहरातील पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शीळ धरणात मुबलक पाणी असूनही केवळ नादुरज्ञ्त पाईपलाईनमुळे शहरात पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. शीळ धरणातून साळवी स्टॉप जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत ठिकठिकाणी गळती लागली आहे. मुख्य जलवाहिनी ६० ते ७० टक्के नादुरूस्त आहे.
मागील आठवड्यात सत्ताधारी सेना-भाजप नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी एमआयडीसीकडून मिळणार्या पाण्यात मोठी कपात करण्यात आली आहे. एमआयडीसीने शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा करताना पुरवण्यात येणार्या पाण्यातही ४० ते ४५ टक्के कपात केली आहे. एमआयडीसीने केलेली पाणी कपात आणि शीळ धरणातून येणार्या मुख्य जलवाहिनीला असलेल्या गळत्या यामुळे एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.