
रत्नागिरीत स्थायिक झालेल्या राजस्थानी व्यक्तीने केली आत्महत्या
रत्नागिरी ः राजस्थान येथून काही महिन्यापूर्वी रत्नागिरीत आलेल्या आशुतोष मीना (२५, सध्या रा. साळवीस्टॉप, रत्नागिरी) याने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशुतोष मीना राजस्थान येथील महिलेसह रत्नागिरीत आला असता साळवी स्टॉप येथे तो भाड्याने रहात होता. मात्र रात्री झालेल्या भांडणानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली.