
राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक अनंत ठाकूरदेसाई कालवश
राजापूर ः तालुक्यातील कशेळी येथील सहकारी कौल कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तसेच अबँन बँकेचे माजी संचालक अनंत महादेव ठाकूरदेसाई (८१) यांचे वार्धक्याने निधन झाले. कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्याला ओळख होती.
देवगड तालुक्यातील मणचे येथील मुळ रहिवाशी असलेले ठाकूरदेसाई हे अनेक दशके राजापूर शहरातील समर्थनगर येथे स्थायिक झाले होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक संस्थांची पदे भूषविली. काही काळ त्यांनी राजापूर खरेदी विक्री संघात सेवा बजावली होती.