तक्रार मागे घेतली नाही म्हणून मारहाण, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी ः ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेली तक्रार मिटविण्याला नकार दिल्याच्या रागातून मोहन बोदल्या सुर्वे यांच्या पाठीत दगड घालून त्यांना लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी तोणदे बागपाटोळे येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे रत्नागिरी तालुक्यातील तोणदे बागपाटोळे येेथे राहतात. त्यांच्या मुलीची मैत्रीण काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी गावातीलच राजेंद्र सुर्वे यांची तिच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्याकडून मोबाइंल नंबर घेतला होता. मोबाईल नंबर मिळाल्यानंतर राजेंद्र सुर्वे वारंवार तिला फोन करत असे. वारंवार येणार्या फोनला कंटाळलेल्या महिलेने मला फोन करू नको, माझ्या नवर्याला ते आवडत नाही, असे सांगितले होते. तरीही राजेंद्र सुर्वे तीला फोन करत असल्याने तिने ग्रामीण पोलीस स्थानकात राजेंद्र सुर्वे विरूद्ध तक्रार अर्ज दिला होता.
ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी राजेंद्र सुर्वे हा मोहन सुर्वे यांच्या मागे लागला होता.