देवरूख येथील कचरा डंपिंगचा प्रश्न प्रलंबित
देवरूख ः देवरूख नगरपंचायत क्षेत्रातील संकलित केलेला कचरा कांबळटेप परिसरात टाकला जात असून डोंगराला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सबंधित मालकाने कचरा टाकू नये असे आवाहन केले असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. नगरपंचायत क्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.
देवरूख शहरातून दररोज दीड टन कचरा संकलित केला जातो. घंटागाड्यांमध्ये ओला, सुका असे वर्गीकरण करून कचरा पर्शरामवाडीसमोरील कांबळटेप डोंगरावर टाकण्यात येतो. सदरची जागा खासगी मालकाची असून यापासून १५० मीटर अंतरावर नगरपंचायतीची मुख्य पाणी साठवण टाकी, जलशुद्धीकरण प्रकल्प आहे.
पाण्याच्या टाकीपासून किमान ५०० मीटर अंतरावर डंपिंग ग्राऊंड नसावे असा नियम असतानादेखील नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. टाकलेला कचरा भटकी गुरे, कुत्रांमार्फत सर्वत्र पसरवला जातो. भंगार गोळा करणार्यांमुळे कचरा अनेक ठिकाणी पसरला जात आहे