जिल्ह्यातील रस्त्यांच्या नुतनीरणाची कामे अपुरी पर्यटक, नागरिक हैराण
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या नुतनीकरणाची कामे अत्यंत धिम्या गतीने चालू आहेत. ठिकठिकाणी महत्वाची शहरे जोडणार्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यांच्या नुतनीकरणाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढू शकते.
रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला असल्याने पुणे, मुंबई, रायगड, सिंधुुदुर्ग, कोल्हापूर आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य समुद्र किनारे असल्याने प्रचंड संख्येने पर्यटक आकर्षित झाले आहेत. मात्र ते जिल्ह्यात येत असताना अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे सुरू असून काही ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटक नाराज होत आहेत