वीजवितरण कंपनीचा बेजबाबदारपणा वीज कर्मचार्‍याला नडला, विजेचा धक्का बसलेल्या वायरमनचा मृत्यू

आरवली ः संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ वीज महावितरण शाखेचा एक कमचारी सचिन रामचंद्र येलोंडे (२८, रा. चोबारवाडी) हा अखेर महावितरण कंपनीच्या अधिकार्‍याच्या बेजबाबदारपणाचा बळी ठरला आहे. शुक्रवार दि. १७ मे रोजी आरवली ते संगमेश्‍वर दरम्यान ३३ केव्ही लाईनवर काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने मिरज येेथे रूग्णालयात उपचार घेत असताना सचिनची प्राणज्योत मालवली.
१७ मे रोजी लाईनमध्ये बिघाड झाल्याने सर्व कर्मचारी आरवली ते संगमेश्‍वर दरम्यान लाईनमधील बिघाड शोधण्यासाठी सकाळी साडेदहा वाजल्यापासून काम करत होते. दुपारी साडेबारापर्यंत काम करूनही वरिष्ठांकडून काम बंद करून पेट्रोलिंग करण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी लाईन बंद करण्यासाठी घेण्यात आलेले परमीट परत करण्यात आले होते. मात्र पुन्हा परमीट घेवून लाईन बंद करणे गरजेचे होतो. मात्र तसे न होता लाईन चालूच होती असे समजते.

Related Articles

Back to top button