रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाच्या विरोधात रोटरी क्लबचा आंदोलनाचा इशारा 

0
109

खेड-भरणे ः खेड-भरणे रोडवर शनिवारी २५ मे रोजी १९ वर्षीय युवकाचा खड्ड्यात मोटरसायकल स्लीप होवून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात एका मोठ्या खड्ड्यामुळे झाला असून खेड भरणे येथील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत प्रशासनाची उदासिनता असून याबाबत रोटरी क्लब खेड यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा खेड पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
२५ मे रोजी खेड भरणे रोडवर टेलिफोन एक्स्चेंजसमोर १९ वर्षीय कु. मिहीर जैन याला खड्यात मोटरसायकल स्लीप होवून प्राण गमवाला लागला. हा युवक खड्ड्यात पडून अपघाताचा बळी ठरला. मात्र गेले अनेक दिवस येथे अपघात होत असताना प्रशासन ढिम्म असून प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्यामुळे खोदलेले रस्ते त्वरित न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.