रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व मतदार संघातील आमदारांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

0
143

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार व शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत ह्यांनी मतदारसंघातील सर्व आमदारांसह शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. त्यासमयी राज्याचे गृहराज्यमंत्री दिपकजी केसरकर, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी, म्हाडा अध्यक्ष व रत्नागिरी चे लोकप्रिय आमदार उदयजी सामंत, चिपळूण चे आमदार सदानंद चव्हाण, कुडाळ-मालवण चे आमदार वैभवजी नाईक, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीरजी मोरे, जिल्हाप्रमुख विलासजी चाळके, माजी आमदार गणपतजी कदम ह्यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.