मुंबई-गोवा महामार्ग खोदलेल्या मातीमुळे पावसाळ्यात प्रवाशांना वाहतुकीस धोकादायक ठरणार
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक ठिकाणी खोदलेल्या मातीमुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. उन्हाळ्यामध्ये वाढलेली वाहनांची संख्या आणि वाहनांचा वेग यामुळे तर अनेक अपघात झाले आहेत. रस्ता होत असताना रस्त्यांच्या बाजूला असणारी गटारे तसेच जमिनीला दिलेला उतारा यावर योग्य प्रकारे दगडाचे पिचिंग न झाल्यास पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक होणार आहे.
मुंबई-गावा मार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रस्ता रूंदीकरण करतानाचे त्यावर असणारी वळणे काढली जातात परंतु अजूनही अनेक ठिकाणी मातीचे भराव प्लॅन व केल्यामुळे ते वाहतुकीला धोकादायक ठरत आहेत.