डॉ. सावंत, दीपक कदम यांना समाजसेवक तर सुभाष कदम यांना समाजरत्न पुरस्कार

0
124

चिपळूण ः लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था सांगलीचा अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार जालगांव येथील निवृत्त पशुधन विकास अधिकारी, ज्योतिषतज्ञ, हस्तरेषा विशारद डॉ. अनिल सावंत व रत्नागिरी जिल्हा संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांना तर याच संस्थेचा समाजरत्न पुरस्कार प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कदम यांना जाहीर झाला आहे.
डॉ. अनिल सावंत हे अनेक वर्ष सामाजिक काम करीत आहेत. तर सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असणारे पेठमाप येथील दीपक कदम यांनी समाज आरक्षणासाठी लढा व मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे.