पोलिसांचे स्टीकर लावून वाडा येथे अवैध दारू वाहतूक
गुहागर ः पालघरच्या राज्या उत्पादन शुल्काच्या भरारी पथक गुन्हा अन्वेषण विभागाच्यावतीने ११ लाख २९ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल वाडा तालुक्यातील घोणसई येथे ताब्यात घेण्यात आला. फॉर सेल इन दादरा ऍण्ड नगर हवेली मार्ग असलेले ८९.६४ लि. विदेशी मद्य झायलो गाडीतून जप्त केले आहे. गाडीवर पोलीस गाडी असा स्टिकर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
घोणसई येथील सचिन रमेश घरत हा फरार असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्याच्यावर दारू वाहतुकीचे अनेक गुनहे आहेत. ज्या गाडीतून दारू वाहतूक केली त्या गाडीच्या काचा काळ्या रंगाच्या तसेच गाडीवर पोलीस गाडी असा स्टीकर लावण्यात आला आहे. त्याच्या घरी दारूचा साठा असल्याचे समजताच पोलीस पाटील यांच्या मदतीने त्याला अटक करण्याच्या हेतूने पोलिसांनी छापा टाकला परंतु सचिन पोलिसांच्या हातून निसटला त्याने दारू वाहतुकीसाठी तैनात केलेली ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल आणि १० लाख रुपये किंमतीची झायलो, विदेशी बनावटीच्या दारूसह जप्त करण्यात आली.