
ऐन पाणीटंचाईत ११ कुटुंबांची पाणी कनेक्शन तोडली
राजापूर ः ऐन पाणीटंचाईच्या काळात सौंदळ पाजवेवाडी येथील ११ कुटंबांचे पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आल्याने या कुटुंबाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची कनेक्शन तोडणार्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार माजी सरपंच रमेश पाजवे यांनी गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांकडे देखील कैफियत मांडण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींमार्फत सन २००७ मध्ये नळपाणी योजना सुरू झाली तेव्हापासून सन २०१५ पयत ही कुटुंबे ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टी भरीत होती. त्यानंतर सरपंच बदलल्याने गावातील काही लोकांनी आपल्या मर्जीने योजना ताब्यात घेतली व वाडीतील नळधारकांकडून पाणीपट्टी घेवू लागले. मात्र या ११ कुटुंबांना दिलेल्या पाणीपट्टीची पावती त्यांनी मागितली असता प्रशांत गराटे, रामचंद्र कदम, अनंत गोतावडे, संदीप दळवी यांच्यासह २० ते २५ जणांनी आपल्यासह ११ कुटुंबांची पाण्याचे कनेक्शन १७ मे २०१९ रोजी तोडले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या कुटुंबांना पाण्याशिवाय वणवण करावी लागत आहे.