
एटीएम मशिनमध्ये खडखडाट
साखरपा ः बहुतांशी बँकांच्या एटीएमध्ये खडखडाट झाल्याने स्थानिकांसह पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोणत्याही क्षणी ग्राहकांना पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी संगमेश्वर तालुक्याच्या बहुतांश भागात विविध बँकांनी एटीएमची अत्यावश्यक सुविधा करून दिली आहे. सलग येणार्या सुट्ट्यांमुळे एटीएम मशिनमधील रोकड संपल्याचा फलक बँकांमार्फत लावण्यात आला आहे. येणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेवून एटीएममध्ये रोकड न ठेवल्याने अनेकांना त्याचा फटका बसत आहे. ऐन गर्दीच्या हंगामात बँकांमध्ये पैसे असूनही एटीएममधील खडखडाटामुळे ते काढता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिक, पर्यटक नाराज झाले आहेत.