आरोग्य विभागाची क्षयरूग्ण शोधासाठी मोठी शोध मोहिम
रत्नागिरी ः आरोग्य विभागाच्यावतीने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरूग्ण शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ५६ हजार १४९ जणांची तपासणी करण्यात आली आहेत.
क्षयरोगामुळे दररोज देशात सहाशे लोकांचा मृत्यू होतो तर ६ हजार व्यक्तींना दररोज क्षयरोगाची लागण होते. नियमित उपचार घेतले जात नसल्याने क्षयरूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात १७१२ क्षयरूग्णांवर उपचार करण्यात आले. यामधील १५३० रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर उर्वरित रूग्णांवर उपचार सुरु आहेत.