चाफे येथे दुचाकी अपघातात तिघेजण जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी-जयगड मार्गावरील चाफे येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरूणीसह तिघेजण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. यातील अतुल दिलीप माचिवले, अमित माचिवले, प्रणाली माचिवले हे आपल्या दुचाकीवरून गणपतीपुळे येथून जाकादेवी येथे घरी येत होते. चाफे तिठा येथे अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे हे तिघेही रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यातील अमित याच्या पायाचे हाड तुटल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पोलीस अपघात करणार्या गाडीचा शोध घेत आहेत.