सामाजिक कार्यकर्ते रफिक कास्कर यांचे दुःखद निधन
चिपळूण ः चिपळूण येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कास्कर आळी येथील रहिवासी रफिक हसन कास्कर यांचे आकस्मिक निधन झाले. ते ५५ वर्षाचे होते. सामाजिक कार्यकर्ते रफिक कासकर हे कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. तसेच कॉंग्रेसचे सध्याचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांचे ते खंदे समर्थक मानले जात होते. गेले अनेक वर्षे ते सामाजिक व राजकारणात सक्रिय होते.