आंबोलीमध्ये लुटमार सावंतवाडीतील बिल्डरला लुटले

सावंतवाडी ता.१५: येथील बांधकाम व्यवसायिक अजय गोंधावळे यांना आंबोली येथे चार ते पाच जणांनी लुटले आहे.त्यांच्याकडे असलेले सुमारे सात तोळे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले.हा प्रकार आज चार वाजण्याच्या सुमारास येथील नाना पाणी परिसरात घडला.
तत्पूर्वी डंपरच्या माध्यमातून त्यांनी गोंधावळे यांच्या गाडीला अपघात केला.व याबाबत विचारणा करण्यासाठी ते गेले असता त्यांनी त्यांना लुटले.कालच आंबोली येथे लुटण्याचा घडलेला प्रकार ताजा असतानाच पुन्हा प्रकार घडल्यामुळे आंबोली घाटातील सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
याबाबतची तक्रार देण्यासाठी श्री गोंधावळे यांनी येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.झालेला प्रकार असा श्री.गोंधावळे हे आपल्या घरातील नातेवाईकांसह पुणे ते फिरण्यासाठी गेले होते.तेथून परतत असताना आंबोली येथे नाना पाणी वळणावर एक अपघात झाला होता.ट्राफिक जाम झाले होते त्यामुळे श्री गोंधावळे यांनी आपली गाडी थांबवली अपघाताची माहीती घेत असताना मागून भरधाव येणार्‍या एका कर्नाटक पासिंग डंपरने त्यांच्या बीएमडब्लू गाडीला मागून धडक दिली.
अपघाताचा आवाज येताच श्री गोंधावळे यांनी त्याची विचारणा करण्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी त्यातील दोघांनी त्यांच्या गाडीची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला व अन्य तिघांनी त्यांच्या गळ्यात हातात असलेले सोन्याचे दागिने खेचून घेतले व डंपर चालू करून तेथून पलायन केले. यावेळी श्री गोंधावळे हे कुटुंबासमवेत असल्यामुळे तसेच परिसरात रेंज नसल्यामुळे तेथे फोन करू शकले नाही अखेर त्यांनी आत्ताच सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे त्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Related Articles

Back to top button