एसटीने धडक दिल्याने पालगड येथे महिलेचा मृत्यु

0
334

रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला पालगड येथे एसटी बसने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर महिलेचे नाव गंगाबाई चव्हाण असे आहे . सदरची बस दापोलीहून मुंबईकडे जात होती सकाळी नऊच्या सुमाराला ही बस पालगड गावाच्या बाहेर आली असता रस्त्यावरून चालत जाणाऱ्या गंगाबाई हिला बसची धडक बसली त्यामुळे ही महिला बसच्या पुढील चाकाखाली आली आणि तिच्या अंगावरून बस गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.ही घटना कळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह हलवणार नसल्याचे सांगत मार्ग रोखून धरला अखेर एसटीचे अधिकारी घटना स्थळी आले व तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये दिले.