रेल्वेतून पडून तरूण गंभीर जखमी

रत्नागिरी ः उक्षी ते भोके दरम्यान रेल्वेतून पडून अरूण गुरव (३५, रा. संगमेश्‍वर) हा तरूण गंभीर जखमी झाला. रविवारी दुपारी ४ वा. ही घटना घडली.

अरूण गुरव हा तरूण रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास मांडवी एक्स्प्रेसमधून पडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे त्याच्या उजव्या पायावरून गेल्याने पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अरूणला मंगला एक्स्प्रेसमधून रत्नागिरीत आणून तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button