बेळगाव येथील तरुणाची लॉजवर आत्महत्या

0
406

रत्नागिरी शहरातील एसटी स्टँड जवळील रिजन्सी लॉजवर बेळगाव येथील बसवराज पाटील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड आली लॉजचे मालक सलीम मुकादम यांनी रात्री पोलीस स्थानकाला खबर दिली यातील बसवराज पाटील यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती परंतु येणे अॅडव्हान्स दिला नव्हता तो आणण्यासाठी मालकाने नोकराला रूममध्ये पाठवले होते दार ठोठावले तरी पाटील दार उघडत नसल्याने मालकांनी पोलिसात तक्रार केली घटनास्थळी पोलीस आले त्यांनी रूमचा दरवाजा फोडला असता पाटील याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले