चरित्रकार धनंजय कीर याचे चरित्र आता इंग्रजीमधून
रत्नागिरी ः पद्मभूषण धनंजय कीर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे चरित्र इंग्रजीतून साकारत आहे. त्यासाठी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी प्रयत्न केले आहे.
ब्रिटीशकालीन भारतातील महान नेत्यांची इंग्रजी आणि मराठी चरित्र लिहून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करणारे चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे इंग्रजी भाषेतील समग्र चरित्र रत्नागिरीतील राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या लेखणीतून साकारणार आहे. १२ मे रोजी पद्मभूषण धनंजय कीर यांचा ३५ वा स्मृतिदिन होता.