एमआयडीसीकडे पाण्याचा साठा अपुरा पाणी विकत घेण्याची वेळ

0
291

रत्नागिरी तालुक्यातील पाणीसाठयातसाठ्यात कमालीची घट झाली असून याचा फटका एमआयडीसीला देखील बसला आहे रत्नागिरी एमआयडीसी अनेक उद्योगांसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींना व शहराला पाणीपुरवठा करीत असते मात्र एमआयडीसीच्या हरचेरी धरणात आता पाण्याचा साठा आठ दिवस पुरेल एवढाच आहे दरवर्षी हा साठा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवत असतो मात्र यावर्षी या धरणातील साठा संपुष्टात आला आहे पुढील काळात पाणीटंचाई होऊ नये म्हणून एमआयडीसीने पाटबंधारे विभागाच्या शिपोशी धरणातून तीस लाख घनमीटर पाणी विकत घेतले आहे हे पाणी अर्चरी धरणात येण्यास काही कालावधी लागणार असल्याने एमआयडीसीने पाण्यात पंचवीस टक्के कपात केली आहे या सर्वाचा परिणाम म्हणून या पाण्यावर अवलंबून असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना देखील पाणी कपात करावी लागणार आहे