गणपती उत्सवासाठी ४०० नव्या शिवशाही गाड्या एस.टी.च्या ताफ्यात

0
98

मुंबई ः कोकण रेल्वेची गणपती हंगामासाठी आरक्षण फुल्ल झाल्याने अस्वस्थ झालेल्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्य परिवहन विभागाने जादा एस.टी. बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४०० नवीन शिवशाही गाड्या आपल्या ताफ्यात वाढविण्यात येणार आसल्याची माहिती दिली.
येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांच्या मदतीसाठी एस.टी. येणार आहे. कोकणसह राज्यातील गणेशभक्तांना एस.टी. महामंडळाने दिलासा दिला आहे. शिवशाही गाड्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर मात करण्यासाठी गाड्यांच्या चेसीस आणि इंजिनमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत. तसेच इंजनची क्षमता वाढवण्यासाठी २५० अश्‍वशक्तीचे इंजिन बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.