स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नविन ५ शाखांना मंजूरी,देवगड शाखा लवकरच सुरु.

नविन शाखा सुरु करण्याच्या परवानगीसाठीचे सर्व निकष पूर्ण करींत स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे ५ नवीन शाखांना परवानगी मिळाली आहे. मागील २५ वर्ष ‘ अ ‘ ऑडीट वर्ग, १६५ कोटीच्या वर ठेवी, ६० ते ७० टक्यांमध्ये सीडी रेशो, १९ कोटीचे वर स्वनिधी, ९९.९२ टक्के वसूली, सातत्यपूर्ण नफा व सीबीएस पूर्ततेसह संपूर्ण संगणकीकरण असे सर्व निकष पूर्ण केल्याने आजच मा.सहकार आयुक्त यांनी संस्थेच्या नविन ५ शाखांना मंजूरी दिली आहे. यामध्ये सिंधूदुर्ग जिल्ह्यातील संस्थेची पहिलीच शाखा देवगड शहर तसेच कोल्हापूर शहर व रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर व देवरूख येथे व रत्नागिरी शहरामध्ये स्वतंत्र शहर शाखा अशा पाच शाखांच्या परवानगी संस्थेला प्राप्त झाल्या आहेत. २८ वर्षापूर्वी सुरु झालेली संस्था आज राज्यस्तरीय कार्यक्षेत्रामध्ये विस्तारली आहे. संस्थेच्या १५ शाखा पूर्वीपासूनच कार्यरत असून त्या सर्व नफ्यामध्ये आहेत. राज्यातील दिशादर्शक कामकाज असणाऱ्या पतसंस्थांमध्ये संस्थेचे नाव घेतले जाते. संस्थेच्या या आदर्श कामकाजामुळेच संस्थेला विविध पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ सहकार भूषण ‘ पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत दीपस्तंभ पुरस्कार, बँको पुरस्कार व सहकार सुगंध तर्फे देण्यात येणार प्रतिबिंब पुरस्कार संस्थेला प्राप्त झाले. संस्थेचे गतिमान, विश्वासार्ह अर्थकारण अधिक द्रुतगतीने पुढे नेण्यासाठी आता अधिकाच्या संधी प्राप्त होतील. आर्थिक क्षेत्रामध्ये खूप स्पर्धा आहे. मात्र त्यामध्ये खूप संधीही आहेत. या संधीचा उचित अर्थकारणासाठी लाभ घेण्यात संस्था अग्रेसर राहील. जिल्ह्यातील जनतेचा विश्वास संस्थेने यापूर्वीच संपादन केला आहेच आता सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्येही विश्वासार्ह सेवा देवून देवगड येथिल जनतेच्या मनातही संस्था आदराचे स्थान प्राप्त करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button