विवाहितेवर बलात्कार करणार्‍या तरूणाला सात वर्षे सक्तमजुरी

0
264

रत्नागिरी ः विवाहित तरूणीला जबरदस्तीने जंगलात नेवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अमित यशवंत जाधव (रा. खंडाळा) याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. यातील पिडीत महिला ही वाटद खंडाळा येथे रहात असून ती काही ठिकाणी घरकामासाठी जात असे. यातील आरोपी अमित याने तिला उसने घेतलेले पैसे द्यायचे आहेत असे सांगून तिला बोलावून घेतले आणि जंगलात नेवून तिच्यावर बलात्कार केला होता.