रनपारपासून पावस समुद्रकिनारी मासे मृत होण्याचे प्रकार
रत्नागिरी ः रत्नागिरीतील रनपार जेटीपासून पावस खाडीकिनारीपर्यंत मासे मरून किनार्यावर येण्याचे प्रकार गेल्या काही दिवसापासून घडत आहेत. मरणार्या माशांच्या तोंडातून हिरवा फेस येत असल्याने माशांचा मृत्यू प्रदूषणामुळे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या सहा दिवसांपासून खाडीकिनारी मासे मरत असल्याचे प्रकार या भागात घडत आहेत. मात्र हे मासे नेमके कशामुळे मरत आहेत याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली नसल्याने लोकांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. हे मेलेले मासे खाणे आरोग्याच्या दृष्टीने घातक असून असे मासे कोणीही खाऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.