रत्नागिरी परिसरात चोरटे सक्रिय

0
300

रत्नागिरी ः घरातील कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार जयगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. यातील साक्षी अनिल चव्हाण (रा. खंडाळा) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला. चव्हाण यांच्या घराचे कुलुप तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा अंदाजे ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. चव्हाण कुटुंब घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला. याबाबत जयगड पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली.