भाट्ये समुद्रकिनार्‍याच्या खडकात जाळून घेतलेल्या तरूणाच्या मृत्यूचे गूढ

0
415

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरानजिकच्या भाट्ये समुद्रकिनार्‍याजवळील असलेल्या खडकात तुषार बाळकृष्ण चौधरी (रा. बोर्डींग रोड, सन्मित्रनगर) याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याने ही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. यातील तुषार याची आई मनोरूग्णालय येथे कामाला आहे. तिला सोडून हा तरूण भाट्ये येथे गेला व तेथे खडकात जावून त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. परंतु पेटलेल्या अवस्थेत वेदना असह्य झाल्याने त्याने आरडाओरड सुरू केली. भाट्ये किनारी फिरण्यासाठी येणार्‍या लोकांना हा प्रकार आढळून आल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटकास्थळी येवून तरूणाला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.